काळजीवाहू मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी माघार घेत मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा मार्ग मोकळा केला असला तरी ते नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्याच्या गृहखात्यासह 12 मंत्रिपदांची मागणी केली आहे. मात्र आता शिंदे गटाच्या चार मंत्र्यांच्या समावेशाला भाजपने आक्षेप घेतल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझाने सदर वृत्त दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अब्दुल सत्तार , दीपक केसरकर, तानाजी सावंत , संजय राठोड या चार नेत्यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश करण्यास भाजपचा आक्षेप असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या चारही मंत्र्यांनी केलेल्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचे समजते. आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.