लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 9 खासदार निवडून आणत खरी शिवसेना कोणाची हे दाखवून दिले. त्याचवेळी आता शिंदेंच्या शिवसेनेकडून विजयी झालेले काही खासदार आता उध्दव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील एकूणच राजकीय परिस्थिती आणि भविष्याचा विचार करून शिंदे गटाच्या खासदारांमध्ये चलबिचल असून ते ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. यादृष्टीने मुंबईत मोठ्या घडामोडी सुरु आहेत. एबीपी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने सदर वृत्त दिले आहे.
महाराष्ट्रात भूकंप…शिंदे सेनेचे नवीन खासदार उध्दव ठाकरेंच्या संपर्कात…
- Advertisement -