विरोधी पक्षनेते असणारे अजित पवारच आता सत्तेत जाऊन बसलेत. अजित पवारांच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय. रील्स स्टारच्या प्रतिभेला बहर आलाय.ओंकार शिंदे या व्हीडिओ क्रिएटर एक हलकं फुलकं रील बनवलं आहे. यात अजित पवार यांना शरद पवारांचा फोन येतो. तेव्हा काका, काका, काका म्हणत अजित पवार प्रतिसाद देण्यास नकार देतात. त्याच्या पुढे जाऊन ज्या नंबरशी आपण संपर्क करू इच्छिता तो सध्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यात बीझी आहेत. नंतर फोन करा, असं अजित पवार म्हणताना दाखवण्यात आलं आहे.
सुप्रिया सुळे यांचा फोन आल्याचंही या रीलमध्ये दाखवण्यात आलं आहे. तेव्हा मी नाही येत आता, असं अजित पवार म्हणताना दाखण्यात आलं आहे. आणखीही काही नेत्यांचे फोन आल्याचं ओंकार शिंदेने या रीलमध्ये दाखवलं आहे.