लोकसभेच्या प्रचारादरम्यान जेवढी बीडच्या निवडणूकीची चर्चा होती. तेवढीच चर्चा मतदानानंतरही सुरू आहे. बीडच्या मतमोजणीत बीडचे अधिकारी नको अशी मागणी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय. भाजपच्या पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे राजकारण अधिकच तापलंय. यावरचा हा विशेष रिपोर्ट.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक मुद्यांवरून वादग्रस्त ठरलेल्या बीडमध्ये अजूनही वाद थांबायला तयार नाही. पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यातील वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात गेलाय. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी थेट आयोगाला पत्र लिहून बीडमधील अधिका-यांची तक्रार केलीय. बीड जिल्ह्यातल्या अधिका-यांना मतमोजणीपासून लांब ठेवण्याची मागणी सोनवणेंनी आयोगकडे केलीय. या अधिकाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेत ठेवलं तर हे जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील.
बीड जिल्ह्यात बोगस मतदान आणि बुथ कॅप्चर केल्याचा आरोप करत शरद पवार गटानं यासंजर्भातले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. तर त्यावर सुनिल तटकरेंनी जोरदार प्रहार केलाय. तर बजरंग सोनवणेंच्या पत्रानंतर महाविकास आघाडीने हाच मुद्दा राज्यभर लागू करण्याची मागणी केलीय.