राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने
सोशल मीडियावर एक्स प्लॅटफॉर्मवर एक कथित व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अजित पवार यांच्या एका सभेतला असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सभेत मंचावर अजित पवार बोलत आहेत. मात्र सभेला फारशी गर्दी झालेली दिसत नाही. सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात अनेक ठिकाणी रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत. तर काही जण सभा सोडून निघून जात असल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने यांनी या व्हिडीओला ‘अतिशहाणा त्यांचा मंडप रिकामा’ असा मथळा (टायटल) दिला आहे. तसेच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “या भाषणापेक्षा डोंबाऱ्याच्या खेळाला जास्त गर्दी असते!” व्हिडीओसह #MoyeMoye हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर व्हिडीओमध्येदेखील हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत आहे.