Monday, March 4, 2024

अजितदादा म्हणाले, बच्चा आहे तो…. रोहित पवारांचे प्रत्युत्तर, बच्चे मनके सच्चे

आ. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीच्या बारामती आणि पुणे कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) शुक्रवारी छापे टाकले. यावरून रोहित पवार यांनी भाजपा आणि अजित पवार गटावर हल्लाबोल केला. “सत्तेतील मोठ्यानं आवाजात बोलणाऱ्या नेत्यांना एवढंच सांगणं आहे की, मी विदेशात होतो. मी चूक केली असती, तर भारतात आलोच नसतो. दुसरं की खरी चूक केली असती, तर अजित पवारांबरोबर भाजपासोबत गेलो असतो. मात्र, आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.

रोहित पवारांच्या विधानाबद्दल पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “बच्चा आहे, बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यावीत, एवढा मोठा झाला नाही. माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते उत्तर देतील.”

यावर रोहित पवार यांनी ‘एक्स’ अकाउंटवर ‘दो कलियाँ’ या हिंदी चित्रपटातील व्हिडीओ ट्वीट करत अजित पवारांना टोला लगावला आहे. “बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर…”, अशा गाण्याच्या पंगती लिहित रोहित पवारांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles