काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता. याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी विखे- पाटलांच्या पक्षांतरावर घणाघात केला.राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष आतापर्यंत बदलले आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेललं आहे. मग शिवसेनेमध्ये त्यांच्यावर आम्ही काय बोलणार? कोण जातं आणि राहतं? हे येणारा काळ ठरवेल. भाजपकडे सत्ता नसेल, तेव्हा आपण कुठे असणार आहात? याचा विचार केला पाहिजे, असा खोचक टोला यावेळी संजय राऊतांनी लगावला आहे.