महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्र डागलं आहे. शरद पवारांशिवाय अजित पवारांना कोणी विचारात नाही. अजित पवारांनी भाजपात सामील व्हावे किंवा स्वत:चा पक्ष स्थापन करावा. अन्यथा शरण जावे, असं वक्तव्य शालिनीताई पाटील यांनी केलं आहे. त्या ‘मुंबई तक’शी बोलत होत्या.
शरद पवारांनी केलेलं बंड आणि अजित पवारांनी केलेल्या बंडामध्ये फरक आहे. तेव्हाचं बंड दोन पक्षांच्या मतभेदामुळे झालं होतं. तेव्हा ‘खंजीर खुपसला’ हा शब्दप्रयोग मी केला होता. मी बारामतीत जाऊन जाहीर सभा घेत शरद पवारांवर टीका केली होती. पण, राजकारणात राहण्यासाठी तेच विषय घेता येत नाहीत. अजित पवारांनी केलेलं बंड स्वत:च्या पक्षात केलं आहे. शरद पवारांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर पुलोद नावाची संघटना काढली होती. अजित पवार आणि छगन भुजबळ नवीन पक्ष स्थापन करणार का?” असा सवाल शालिनीताई पाटील यांनी उपस्थित केला आहे.