“निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाला बळ दिलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. आजच्या प्रवेशाचे वैशिष्ट्य आहे. एक नेते उदगीरचे आणि दुसरे देवळालीचे. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिला, पण दोन्ही विजयी उमेदवारांनी लोकांचा घात केला, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत,” असे शरद पवार म्हणाले.
“महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. लोकसभा लोकांनी हातात घेतली. लोकांनी मोदीचे सरकार पाहिलं आणि बदलण्याचा निर्णय घेत ३१ जणांना निवडून दिले. यामध्ये राष्ट्रवादीच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या. हा एक संदेश आहे, असे म्हणत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 288 पैकी विरोधकांच्या (मविआ) 225 जागा निवडून येतील,” असा मोठा आकडा शरद पवार यांनी सांगितला.