राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. या दरम्यान राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक अधिवेशनाला हजर राहिले आहेत. या अधिवेशनादरम्यान भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांची भेट झाली. लिफ्टमधून जात असताना फडणवीस आणि ठाकरे यांची भेट झाली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकमेकांसमोर आले. दोघेही उद्धव ठाकरे-फडणवीस एकाच लिफ्टमधून सभागृहात गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे- फडणवीस लिफ्टजवळ एकमेकांशी बोलले. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. मात्र त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क- वितर्कांना उधाण आले आहे.
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांची भेट घेतली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना चॉकलेट दिलं. त्याचबरोबर अनिल परब यांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात उध्दव ठाकरे आणि दानवेंची भेट घेतली. यावेळी या नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली. त्यावेळी अनिल परब देखील उपस्थित होते.