राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हातून अखेर कृषीमंत्रीपद निसटलं आहे. कृषीमंत्री म्हणून त्यांची वर्षभराची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ मंत्र्यांनी कृषी खात्याची जबाबदारी सरकारमध्ये सामील झालेले नवे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोपवली आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं काढून अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे
विशेष म्हणजे या खातेवाटपात आणखी दोन मंत्र्यांना झटका बसला आहे. मंत्री संजय राठोड यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन हे खातं होतं. पण त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांच्या हातून देखील हे खातं निसटलं आहे. संजय राठोड यांना आता मृदा व जलसंधारण खातं देण्यात आलं आहे. तर मंत्री अतुल सावे यांच्याकडून सहकार खातं काढून घेण्यात आलं आहे. सावे यांना गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची जबाबदारी मिळाली आहे.
राज्य सरकारकडून अखेर खातेवाटप जाहीर….तीन मंत्र्यांना मोठा झटका
- Advertisement -