येत्या 23 तारखेपासून राज्यात मोठा पाऊस होणार असल्याचा इशारा पंजाबराव डखांनी दिला आहे. हे 23 जून नंतर महाराष्ट्रात विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे. 23 जून ते 25 जून दरम्यान तुरळक ठिकाणी पण चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.
दरम्यान, 26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. एवढेच नाही तर त्यांनी जुलै महिन्यात 10 ते 15 जुलै या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 19, 20 आणि 25, 26 जुलै दरम्यानही चांगला पाऊस पडणार असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.