मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाने दडी मारली असली, तरी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. राज्यातील अनेक भागाला जोरदार पावसाची प्रतीक्षा असताना हवामान आनंदाची बातमी दिलीय. पुढील ४८ तासात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल, अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
आज दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने येथे ऑरेंज अलर्ट दिलाय. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल. विदर्भ, मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रीय असून पुढील ४८ तासात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलीय.