Friday, December 1, 2023

ऑक्टोबर हिट’पासून दिलासा मिळणार,राज्यातील काही भागात पावसाची शक्यता

राज्यातील नागरिकांना ‘ऑक्टोबर हिट’पासून दिलासा मिळणार आहे. पावसाअभावी गेल्या काही दिवसांपासून नागरिक ‘ऑक्टोबर हिट’मुळे त्रस्त झाले आहेत. याचदरम्यान, हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावासाची शक्यता वर्तविली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना ‘ऑक्टोबर हिट’पासून दिलासा मिळणार आहे.
राज्यात उद्या काही भागात पावसाची शक्यता आहे. या संदर्भात हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी कोकणातील काही ठिकाणी ढगाळ आकाश आणि काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे,असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात परतीचा पाऊस सुरु झाल्याने गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागत आहेत. राज्यातील काही भागात ३२ अंश सेल्सिअस पाहायला मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचाही पारा २८ अंशावर पोहोचला होता.
राज्यातील काही भागात कमाल तापमान सामान्य तापामानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक नोंदविण्यात येत आहे. मुंबई,पुण्यासहित मराठवाड्यातही नागरिकांना ऑक्टोबर हिट जाणवत आहे. मात्र, हवामान विभागाने काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे नागरिकांना ‘ऑक्टोबर हिट’पासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: