शालेय शिक्षणमंञी दीपक केसरकर यांनी शिक्षकांच्या नियुक्तीबद्दल घेतलेला आणखी एक निर्णय आता वादात आला आहे. केसरकर यांनी 70 वर्षीय पेन्शनधारक रिटायर्ड शिक्षकांना कंञाटी पद्धतीने नियुक्तीचे शासनआदेश काढले आहेत. अशात 55 हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरायचं सोडून आणि बेरोजगारांना संधी न देता, हा निर्णय घेतल्याने बीएड धारकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरमहा 50 हजारांची पेन्शन उचलणाऱ्या रिटायर्ड शिक्षकांना 20 हजाराचे मानधनही देण्यात येणार आहे. एकीकडे लाखो डिएड, बीएड पदवीधारक नोकरीविना बेरोजगारी सहन करत आहेत. मात्र शिक्षणमंञी 70 वर्षीय रिटायर्ड शिक्षकांची कंञाटी भरती करत आहेत. त्यामुळे 70 वर्षीय सेवानिवृत कंञाटी शिक्षण भरतीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षक संघटना तसंच बेरोजगार डिएड, बीएड धारकांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. टीईटी पाञ बेरोजगारांनाच शिक्षकपदी नियुक्त करा, अशी मागणी शिक्षक संघटना आणि बेरोजगार युवकांनी केली आहे.