Wednesday, April 30, 2025

छगन भुजबळांना मोठा दिलासा! त्या’ प्रकरणात ED ने न्यायालयात केलेली याचिका घेतली मागे

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने उच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्या विरोधात दाखल याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात कळवले आहे. न्यायालयानेही याचिका मागे घेत असल्याची ईडीची मागणी केली मान्य केली आहे. असं असलं तरी मात्र भुजबळ यांचे पुत्र पंकज यांच्या विरोधातील याचिका कायम आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना २०१६ मध्ये झाली रोजी अटकही झाली होती. तब्बल दोन वर्षांनी उच्च न्यायालयाने भुजबळांना जामीन मंजूर केला होता.

या निर्णयाला ईडीने २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीत याचिका नेमकी कशासाठी केली होती हे आठवत नसल्याचे आणि याचिकेची प्रत सापडत नसल्याचे ईडीने अजब दावा केला होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles