नगर : मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणा साठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपाेषण सुरू केले आहे. आज त्या उपाेषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांच्या आंदाेलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून बुधवारी (ता. १४) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यानंतरही राज्य सरकारला जाग आली नाही, तर चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे गाेरख दळवी यांनी दिली.आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. १४ तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा, असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे. मुंबईतल्या आंदाेलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहे. त्याची अधिसूचना काढली आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत, त्यामुळे या कायद्याची तत्काळ अंमलबजाणी व्हावी, यासाठी येत्या १४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. ते मेसेजेसही सोशल मीडियावर सकल मराठा समाजाने व्हायरल केले आहेत. सरकारने तातडीने अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा तातडीने पारित करावा, अन्यथा महाराष्ट्र बंद नंतर चक्काजाम करण्याचा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे.