Monday, April 22, 2024

राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची दोनवेळा परीक्षा होणार..

पुणे : राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची दोनवेळा परीक्षा होणार आहे. त्यात नियतकालिक मूल्यांकन चाचणीसह (पॅट ३) स्वतंत्रपणे होणाऱ्या वार्षिक परीक्षेचा समावेश आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून देण्यात आली.

तसेच २ ते ४ एप्रिल या कालावधीत राज्यातील शाळांनी नियतकालिक मूल्यमापन चाचणी आयोजित केली असल्याने त्या परीक्षेनंतर वार्षिक परीक्षा घेण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले. इयत्ता तिसरी, चौथी, सहावी, सातवीसाठी प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा या तीन विषयांची नियतकालिक मूल्यांकन चाचणी हीच संकलित मूल्यमापन २ असेल. त्यामुळे या विषयांसाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन २ घेण्यात येणार नाही. उर्वरित विषयांसाठीच्या प्रश्नपत्रिका शाळांनी त्यांच्या स्तरावर तयार करायच्या आहेत.

पाचवी, आठवीची वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यात पाचवीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित आणि परिसर अभ्यास हे विषय, तर आठवीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र हे विषय असतील.

तसेच पाचवी, आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन २ म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles