Monday, July 22, 2024

शरद पवारांनी डाव टाकला… म्हणाले अजित पवारांवर गेलेल्या सर्वच आमदारांना पक्षबंदी नाही….

अजितदादांसोबत गेलेले आमदार निधीवाटप झाल्यानंतर परत येतील, अजित पवारांसोबत गेलेल्यापैकी सर्वांनाच आपल्या पक्षात प्रवेशबंदी नसल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं. अजित पवार गटातील अनेक आमदार लवकरच आपल्यासोबत येणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत. यावर अजित पवार गटानं प्रतुत्तर दिलंय.

शरद पवारांचं हे वक्तव्य फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. अजित पवारांसोबतचं कुणीच शरद पवारांकडे जायला तयार नसल्याने त्यांनी आता नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचं मिटकरी म्हणाले. आमच्या आमदारांवर आमचं बारीक लक्ष असून कुणी पक्षशिस्त मोडायचा प्रयत्न केला तर पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles