शिवसेना नेते भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी विमानात जशी हवाई सुंदरी असते त्याच धर्तीवर एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ असणार असल्याची घोषणा केली. मात्र यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सरकारच्या तर्कहीन लहरी धोरणांमुळेच महाराष्ट्राची वाट लागतेय’, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. ‘सरकार कोणत्या विषयांना प्राथमिकता देते यावरून सरकारची वृत्ती आणि शहाणपणा दिसतो. आज राज्यात गळणारी एसटी, पत्रे उडणारी एसटी, खिडक्या तुटलेली एसटी अशा दुरवस्थेत असलेल्या एसटीची स्थिती सुधारण्यावर भर देण्याची गरज असताना तसेच एसटी कर्मचाऱ्यांना, एसटी प्रवाश्यांना पायाभूत सुविधा देऊन त्यांचे आयुष्य सुंदर करण्याची गरज असताना एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष मात्र शिवनेरी सुंदरी सारख्या योजना आणत आहेत’, असे रोहित पवार म्हणाले.https://x.com/RRPSpeaks/status/1841328843803521239