आमदार अपात्रता निकालात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. मात्र उद्धव ठाकरेंच्या अडचणी काही थांबताना दिसत नाही. आता ठाकरेंचं मशाल हे चिन्हही त्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. मशाल चिन्हावर समता पक्षाने पुन्हा दावा ठोकलाय. निवडणूक आयोगाने नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.. त्यानुसार समता पक्षही आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे.. मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्याचा दावाही समता पक्षाने केलाय. तेव्हा आता मशाल चिन्ह ठाकरेंकडे राहणार की त्यांच्या हातातून निसटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.