अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं सेना, भाजपचे आमदार अस्वस्थ आहेत. शिवसेनेच्या दोन आमदारांमध्ये मंगळवारी संध्याकाळी बाचाबाची झाली. दोन आमदार भिडल्याचं समजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा नागपूर दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले.
राष्ट्रवादी सत्तेत आल्यानं शिवसेनेत अस्वस्थता आहे. मंगळवारी वर्षावर झालेल्या बैठकीत याचे पडसाद पाहायला मिळाले. दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाली. त्यांच्यात झटापटही झाली. आमदारांच्या वादाबद्दल समजताच मुख्यमंत्री शिंदे नागपूर दौरा अर्धवट टाकून मुंबईत परतले. त्यांच्या उपस्थितीत आमदारांची समजूत काढण्यात आली.
अजित पवारांमुळे मंत्रीपदाची संधी हुकते की काय…शिंदे गटाचे दोन आमदार आपापसातच भिडले
- Advertisement -