विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरल्याचं समोर आले आहे. महायुतीमध्ये अद्याप जागावाटपाचे घोंगड भिजत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एकमत झालं नाही. पण दुसरीकडे मविआने जागावाटपात बाजी मारल्याचं दिसतेय. मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात पोहचलेय.
मविआच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या फॉर्मुल्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचं समोर आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस ११०, ठाकरेंची शिवसेना ९५ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ८३ जागांवर लढणार असल्याचं समोर आलेय. मित्रपक्षाला जागा तिन्ही पक्ष आपल्या कोट्यातून देणार आहेत. या फॉर्मुल्यावर एकमत झालेय.
लोकसभेला आमच्यासोबत जे घटकपक्ष होते, त्यांना सामावून घेण्यासाठी चर्चा झाली. आमचा फॉर्मुला जळपास संपल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेय.