बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे. याचेच उत्तर आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो. मुंबईत एका आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे दीपक केसरकर यांनी अभिनंदन केलं आहे. दीपक केसरकर म्हणाले आहेत की, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत, ती मुलं पुन्हा बसू शकतात. परीक्षा लवकर घेण्याची सूचना केल्या आहेत.
दीपक केसरकर म्हणाले, ”कोणीही नाराज होऊ नयेत. संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.” ते म्हणाले, दहावीचा निकाल 27 मे ला निकाल लागू शकतो.
कथित आरटीई घोटाळ्यावर बोलताना केसरकर म्हणाले की, याला घोटाळा म्हणता येणार नाही. कोणीही खोटी कागदपत्रे तयार करू नये. अॅडमिशन ही जिल्हा स्तरीय होते. जिल्हास्तरावर गुन्हा नोंदवला आहे. गैरप्रकार कसे रोखता येतील याबाबत प्रक्रिया सुरू आहे.