लालपरी अर्थात एसटी बसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘लालपरी’ने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शाळेतच एसटी बसचा पास मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतलेल्या या निर्णयानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी लांबलचक रांगेत उभं राहण्याची गरज नाही. एसटी पास थेट तुमच्या शाळेत या मोहिमेतंर्गत शाळेतच आता पास मिळणार आहे.