मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेऊन आता वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. परंतु त्यांच्या मंत्रिमंडळाची संख्या अजूनही पूर्ण झाली नाही. शिवसेना अन् भाजपमधील अनेक जण मंत्रिपदाची आस लावून बसले होते. मात्र त्यांना अजूनही संधी मिळाली नाही. त्यापूर्वी अजित पवार यांच्या गटासोबत आलेल्या नऊ जणांचा शपथविधी झाला आहे. आता दोन पक्षांचे सरकार तीन पक्षांचे झाले आहे. या तिन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये कोणाला संधी मिळणार? ही चर्चा सुरु असताना चंद्रकांत पाटील अन् अतुल सावे यांना वगळण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासंदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
चंद्रकांत पाटील, अतुल सावे यांना मंत्रिमंडळातून डच्चू, संघटनेची जबाबदारी सोपविणार ?
- Advertisement -