राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळांवर आपल्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावायला सुरुवात केली आहे. आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादीही लवकरच राज्यपालांकडे पाठवण्यात येणार .आता विधानसभा निवडणुकीआधी या जागांवर नियुक्ती व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.
भाजपकडून महिला आघाडीच्या चित्रा वाघ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, आध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले, तसेच नाशिकचे बाळासाहेब सानप यांची नावे चर्चेत असली तरी ती दिल्लीत पाठवली जातील. त्यानंतरच त्यांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार मनीषा कायंदे, माजी खासदार राहुल शेवाळे यांची नावे चर्चेत. राष्ट्रवादीकडून मात्र, मुंबई बँकेचे सिद्धार्थ कांबळे, रूपाली चाकणकर, माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्यापैकीच तीन नावे निश्चित होणार असल्याचे सांगण्यात येते.