Wednesday, April 17, 2024

नगर जिल्ह्यात शाळेच्या वेळेत बदल करण्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

शाळेच्या वेळेत बदल करण्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी !

अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने व जिल्ह्यातील बहुतांश शाळेत पाणीटंचाई जाणवत असल्याने विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ शाळेत बसणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे .त्यामुळे एक मार्चपासून शाळेची वेळ सकाळी साडेसात ते अकरा या वेळेत करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने निवेदनाद्वारे मा . शिक्षणाधिकारी व मा . मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे केली आहे . शिक्षणाधिकाऱ्यांच्या वतीने उपशिक्षणाधिकारी मिनाताई शिवगूंडे यांनी निवेदन स्विकारले .
निवेदनात पुढे म्हटले आहे की अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या शाळा ह्या ग्रामीण भागातील असल्याने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोयीसुविधांचा अभाव असून कडक ऊन असल्याने दिवसभर शाळा भरवणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेता शाळेची वेळ सकाळच्या सत्रात घ्यावी .
निवेदनावर अध्यक्ष बाळासाहेब सालके ,शिक्षक नेते प्रवीण ठुबे , भास्कर नरसाळे ,अविनाश निंभोरे , सुदर्शन शिंदे , राजेंद्र ठाणगे , रघूनाथ झावरे , बाळासाहेब देंडगे ,विकास डावखरे, संजय नळे ,बाबा पवार , अमोल साळवे , गजानन जाधव , श्री . खळेकर , महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री झरेकर ,संगीता कुरकुटे ,स्वाती झावरे आदींच्या सह्या आहेत.

राज्यातील इतर जिल्हा परिषदांप्रमाणेच सुट्ट्याची यादी जाहीर करतानाच एक मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवणे बाबत आदेशित करण्यात यावे, जेणेकरून दरवर्षी संघटना पातळीवर मागणी करावी लागणार नाही.
– भास्कर नरसाळे
– शिक्षक नेते

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles