आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही नोव्हेंबरमध्येच डिसेंबरचे पैसे देऊ असं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. तसंच, जाहीरनाम्यात वचन दिल्याप्रमाणे पात्र महिलांना दीड हजार रुपये न देता २१०० रुपये देऊ असं आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. परंतु, आता स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन झालेलं नाही. एकनाथ शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. नोव्हेंबर महिनाही सरला आहे, मात्र पात्र महिलांच्या खात्यात लाडकी योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभर वेगळीच चर्चा रंगली आहे. या विधानावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
मुनगंटीवार म्हणाले, “आम्ही १०० टक्के ते आश्वासन पूर्ण करू. महिलांना दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल. निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवं. महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून, संकल्प पत्रातून दिलेली आश्वासनं धुळीस मिळू देणार नाही. आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २,१०० रुपये देण्याची क्षमता आहे. मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल. वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार? जानेवारी की जुलै, कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल. आम्ही गेल्या वर्षी रक्षाबंधनादिवशी दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे २१०० रूपये कधीपासून मिळणार? राज्याचे माजी अर्थमंत्री म्हणाले….
- Advertisement -