Saturday, December 7, 2024

बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, महसूलमंत्री विखे पाटील यांचा इशारा…

राज्यात तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे, गुणवत्ता यादीही प्रचलित धोरणाप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाला संधी नाही. परंतु तरीही बेछूट आरोप केले जात आहेत. एक आमदार तर ३० लाख, २० लाख दिल्याचे आरोप करत आहेत. त्यांचे हे आरोप प्रसिद्धीसाठी आहेत. असे बेछूट आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नियुक्त करायची मागणी केली, याकडे लक्ष वेधले असता विखे यांनी चौकशीसाठी आम्ही तयार आहोत, हवे असेल तर वडेट्टीवार यांच्या पक्षाचे सदस्य त्यामध्ये नियुक्त करावेत, आमची काही हरकत नाही, परंतु ही भरती प्रक्रिया रद्द होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles