शिक्षक, मुख्याध्यापकांचा थांबणार पगार, आधार अपटेड न करणारे भोवणार, ७ जुलै अंतिम मुदत
सोलापूर – खासगी व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सात जुलै रोजी संपणार आहे. या मुदतीत आधार अपडेट न करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचे पगार थांबविण्याच आदेश देण्यात आले आहे. तसेच मुख्याध्यापकांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी सांगितले.विद्यार्थ्यांचे आधार अपडेट पूर्ण केले नसल्याने राज्यात सोलापूर जिल्हा तिसाव्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणानुसार संचमान्यता होणार आहे. तसेच सात जुलैपर्यंत बिंदू नामावली पूर्ण करुन मागासवर्गीय कशाकडे दाखल करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले आहेत.