मुंबई : राज्यातील २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेरपडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित बैठकीत घेतला. विशेष शिक्षक पदनिर्मिती व जुन्या निवृत्तिवेतन योजनेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. राज्यात २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या आणि २०१० पूर्वी १०० टक्के अनुदानावर असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्यानंतर समिती स्थापनेबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा के