नुकतीच राज्यात अकरा हजार शिक्षकांची भरतीची यादी जाहीर झाली आहे. अनेक जिल्ह्यात कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. यानंतर आता शिक्षक भरतीसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी जून महिन्यात टीईटी होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने टीईटीची तयारी करण्याची सूचना केली असून, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून २०१४ पासून टीईटी परीक्षा घेतली जात आहे.