मुंबईत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका करत खळबळजनक आरोप केले आहेत. सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाजात उद्रेक आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्याची टीका त्यांनी केली. तसंच अध्यादेशाचा निर्णय कॅबिनेटपुढे गेला नाही, हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाचा विचारात न घेता काढला गेल्याचा आक्षेप वडेट्टीवार यांनी घेतला. फक्त एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेतला असल्याचा टोला त्यांनी लगावला.
‘सरकार मान तुटेपर्यंत का वाकलं हा सवाल आहे. अहवाल अजून अपूर्ण आहे. आपली शपथ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना पायदळी तुडवलं आहे. सगेसोयरे शब्द वापरला. व्हॅलिडिटी शिथिल झाल्यामुळे कोणालाही त्यात शिरकाव करता येईल. सहज कुणीही व्हॅलिडिटी मिळवू शकेल, त्यामुळे ओबीसी समाजाचं आरक्षण मिटवण्यातचं पाऊल सरकारने उचललं आहे,’ असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
मराठा समाजासाठी अध्यादेश कसा निघाला… विजय वडेट्टीवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट…
- Advertisement -