राज्यातील वाशिम जिल्ह्यात घडला आहे एका म्हशीनं तब्बल दिड लाखांचं मंगळसूत्र गिळण्याची घटना समोर आली आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार सारसी गावात ही घटना घडली आहे. तर त्याचं झालं असं की एक महिला आपल्या म्हशीला गवत खाऊ घालत होती. त्यावेळी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र गवतात पडलं आणि त्या गवतासोबत म्हशीच्या पोटात गेलं. जेव्हा ही बाब महिलेच्या लक्षात तेव्हा तिनं लगेचच आपल्या कुटुंबीयांच्या मदतीनं म्हशीला दवाखान्यात नेलं. तिथे पशु वैद्यांनी या म्हशीची नीट तापसाणी केली. तिचे विविध रिपोर्ट काढले तेव्हा ते मंगळसूत्र तिच्या पोटातच असल्याचं सिद्ध झालं. अखेर ऑपरेशन करून हे २.५ तोळ्याचं हे मंगळसूत्र त्यांनी बाहेर काढलं.