राज्यात शुक्रवारी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वारे जोरात वाहत आहेत. त्यांचा वेग वाढला असून कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने राज्यात पाऊस वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
पुणे, सातारा – रविवार (25 ऑगस्ट) अतिवृष्टी – रेड अलर्ट
पालघर, जळगाव, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा – (25, 25, 27 ऑगस्ट) मुसळधार – ऑरेंज अलर्ट
पालघर (26,27), ठाणे, सिंधुदूर्ग (27) रायगड, रत्नागिरी (28) धुळे (25,26) नगर, नंदुरबार (25), जळगाव (26), पुणे आणि सातारा (26,27), अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ (25 ते 28) – यलो अलर्ट