राज्यभरात सुरू असलेला अवकाळी पाऊस 2 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. हा पाऊस मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी अधिक तीव्रतेने राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवला आहे. पृथ्वीचं वाढतं तापमान हे अवकाळी पावसाला कारणीभूत असल्याचे डख म्हणाले. भविष्यात अवकाळी पावसाला, गारपीटीला सामोर जावं लागणार आहे. हवेचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं अशी स्थिती निर्माण होत असल्याचे पंजाबराव डख म्हणाले. हा पाऊस 2 डिसेंबरपर्यंत राहणार असल्याचे डख म्हणाले. पूर्व विदर्भात हा पाऊस 1 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. पश्चिम विदर्भात हा पाऊस 1 डिसेंबरपर्यंत पडणार आहे. हा पाऊस मुसळधार असणार आहे. ओढे नाले भरुन वाहतील असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यात मात्र 2 डिसेंबरपर्यंत पाऊस पडणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस 1 डिसेंबरपर्यंत राहणार आहे.