राज्यात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्वमोसमी पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाडा काहीसा कमी झाला आहे. आजही राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम आहे. उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. राज्यात उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, लातूर, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ,भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, मुंबईसाठी उष्ण लाटेचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.