राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त पदांवर निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना शिकवण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. रिक्त जागांवर नियुक्ती करण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकांना प्रति महिना 20 हजार रुपये मानधन देण्यात येईल. शाळांमध्ये नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर निवृत्त शिक्षकांचे बाँड संपुष्टात येईल. शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या निवृत्त शिक्षकाचे वय 70 पेक्षा जास्त नसावे अशी अट घालण्यात आली आहे.