व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री वनिता खरात सासूच्या भूमिकेत आहे. तर शिवाली, नम्रता आणि चेताना या तिघींनी सुनबाईची भूमिका साकारलीये. यावेळी या तिघी ‘आम्ही बाई सूना, आम्ही बाई सूना, सासूबाई लावी आमच्या संसाराला चुना’ अशा मजेशीर ओळी बोलत बोलत डान्स करत आहेत. तेवढ्यात वनिता खरात सासूच्या भूमिकेत आणि या तिघीही सुनांची बोबडी वळते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होणार नाही.छोट्या पडद्यावर सगळ्यात जास्त गाजणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यांच्या स्किटमध्ये असलेले एक-एक विनोद हे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. नुकताच शोमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’..आम्ही बाई सूना, सासूबाई लावी आमच्या संसाराला चुना’..Video
- Advertisement -