महाराष्ट्रीयन समारंभात मोठी चपाती बनवण्याची पद्धत आहे.सहसा घरी चपाती बनवताना आपण लहान चपाती बनवतो पण समारंभात जास्त लोकांसाठी स्वयंपाक केला जातो तेव्हा मोठी चपाती बनवली जाते. अशाच एका समारंभातील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये आज्जी मोठी चपाती कशी बनवायची, हे सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे आजीने मोठी चपाती करुन दाखवली आहे. सुरुवातीला आजी दोन मोठे कणकीचे गोळे घेते. त्या दोन कणकीच्या गोळ्यामध्ये एक आणखी कणकीचा गोळा ठेवते आणि तिन्ही गोळे एकावर एक ठेवून चपाती कशी पद्धतशीर लाटायची, हे व्हिडीओत आजी सांगताना दिसत आहे. नंतर एवढी मोठी लाटलेली चपाती तव्यावर कशी टाकायची, हे सुद्धा आजीने व्हिडीओत सांगितले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
भली मोठी चपाती कशी बनवायची…आजीबाईंनी घेतली शिकवणी…व्हिडिओ
- Advertisement -