मराठी माणूस सध्या देशभर नाही तर जगभर आपल्या कामाचा डंका गाजवत आहे. भारतीय नागरिकांनी परदेशात केलेली कमाल कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते. अशात सध्या पुण्यातील पाटील – कुलकर्णी हे अस्सल मराठमोळं जोडपं चांगलंच चर्चेत आलं आहे. कारण या जोडप्याने थेट अमेरिकेमध्ये गावरान मळा फुलवला आहे. त्यांनी आपल्या शेतीचा आणि येथील कामाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
पाटील-कुलकर्णी फार्म असं त्यांच्या शेतीचं नाव आहे. आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वत: दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेमधील अटलांट येथे एक छोटं गाव आहे. या गावात त्यांनी आपल्या महाराष्ट्रासारखं पूर्ण सेटअप केलंय. त्यासाठी त्यांनी येथे शेती सुरू केली. फक्त भाजी-पाल्याची शेती नाही. तर त्यांनी येथे कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या यांसह गायी आणि घोडे सुद्धा पाळले आहेत.अमेरिकेत राहूनही हे जोडपं आपल्या शेतात पिकवलेला भाजीपालाच खातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जोडप्याची शेती फक्त एवढ्यावरच मर्यादीत नाही. त्यांनी आपल्या फार्ममध्ये मधमाशांची सुद्धा शेती केली आहे. येथे ते अस्सल गावठी मध सुद्धा बनवतात.
https://x.com/gurudevgoud/status/1819302018457948591?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1819302018457948591%7Ctwgr%5E5f39c5c97d88948389e942944c6c718b5a5a6721%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fnational-international%2Fmaharashtrian-farm-in-america-atlanta-usa-patil-kulkarni-farm-video-viral-on-social-media-rsj99