शनिवारी राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार अनेक जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत मुसळधार पावसासह गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.