Wednesday, April 30, 2025

ट्रक चालकांचे आंदोलन…डिझेल अभावी एसटी बस सेवा बंद होण्याची शक्यता…

देशभर ट्रक आणि बसचालकांनी आंदोलन पुकारले असून इंधनाची वाहतूक आणि पुरवठा करणाऱ्या वाहनांवरील चालकही संपावर गेले आहेत. परिणामी, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी मंगळवारी सकाळपासून पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी गर्दी केली आहे. ट्रक-बस चालकांच्या संपाचा फटका एसटीलाही बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. डिझेल अभावी एसटी बस सेवा बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणातील दोषींना १० वर्षांचा तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी सोमवारपासून निदर्शने आंदोलन सुरू केले आहे. नववर्षाची सुरुवातच आंदोलनाने झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह देशातील महत्त्वाच्या शहरात ट्रक आणि बस चालकांचे आंदोलन सुरू आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. विदर्भात आंदोलन चिघळले असून विदर्भातील काही आगारांमधील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles