स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांची महात्मा फुले समता परिषद ‘अॅक्टिव्ह मोड’वर आहे.
राज्यात महायुतीची सत्ता आली. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळ यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अॅक्टिव्ह झाल्याचं पहायला मिळत आहे. समता परिषदेचा मेळावा घेताना, राज्य अन् राष्ट्रीय दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.
समता परिषदेचे राज्या उपाध्यक्ष सुभाष राऊत यांनी धाराशिव इथं समता परिषदेची बैठक घेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी लागण्याच्या सूचना केल्या. मराठवाड्यात ‘गाव तिथं शाखा’ अन् ‘घर तिथं समता सैनिक’ ही मोहीम राबवण्याचं ठरवण्यात आलं. पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 100 शाखांचं उद्घाटन करण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे.
मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. मात्र ते आमच्यात आले, तर आम्हालाही काही मिळणार नाही आणि त्यांनाही काही नाही”. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करा, नाहीतर आम्हाला 51% घोषित करा”, अशी मागणी छगन भुजबळ यांनी शेगाव इथल्या माळी समाजाच्या मेळाव्यात केली.
व्ही. पी. सिंह यांच्या या सांगण्यावरून ‘OBC’ समाजाची सेवा करतोय, अशा कार्यक्रमाला जाणे मी टाळतो. कारण समाज एक असला, तरी पक्ष वेगळे असतात, विचारसरणी वेगळी असते. मी ‘OBC’च्या प्रश्नावर शिवसेना सोडली. मी नरसिंह राव यांच्याकडे गेलो. त्यावेळी नरसिंह राव यांनी ‘OBC’ समाजाची सेवा करण्याचा सल्ला दिला होता. त्यातूनच समता परिषद स्थापन झाल्याचे, आदिवासी, दलित, ओपन आणि ‘OBC’ या चार वर्गात बाबासाहेबांनी समाजाला बांधलं. व्ही. पी. सिंहानी नंतर मंडळ आयोगासाठी काम केलं.






