#अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील माता-भगीनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक #साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे. काही साड्या निर्मितीदोष अथवा फाटलेल्या आढळल्यास त्या त्वरित बदलून देण्याची व्यवस्था महामंडळाने अगोदरच कार्यान्वित केलेली आहे. याबाबत काही तक्रारी असतील तर info@mspc.org.in ई-मेलवर तक्रार करावी किंवा 022-27703612 क्रमांकावर सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ कार्यालयीन वेळेत संपर्क करण्याचे आवाहन #वस्त्रोद्योग विभागाने केले आहे.