पालकमंत्री पदाची संभाव्य यादी चर्चेत आली समोर; कोण-कोण आहे या यादीत?

0
31

प्रचंड बहुमताने महायुती सरकार सत्तेत दाखल झाले. पण मंत्रिमंडळ विस्तारापासून ते खाते वाटपाचे गुर्‍हाळ चांगलेच लांबले. मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आला. आता पालकमंत्री कोण यावरून तीनही पक्षात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. एकाच जिल्ह्यात दोघा-तिघांनी दावे ठोकल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढल्याची चर्चा होत आहे. पालकमंत्र्यांच्या संभाव्य यादीत कोण-कोण?

पालकमंत्र्यांची संभाव्य यादी

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे

सातारा – शिवेंद्रराजे भोसले

अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील

अमरावती – चंद्रकांत पाटील

अकोला – आकाश फुंडकर

धुळे – जयकुमार रावल

लातूर – गिरीष महाजन

मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा/ आशिष शेलार

नंदुरबार – अशोक वुईके

पालघर – गणेश नाईक

सिंधुदुर्ग- नितेश राणे

सोलापूर – जयकुमार गोरे

वर्धा – पंकज भोयर

ठाणे – एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे

जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे

यवतमाळ – संजय राठोड

हिंगोली – आशिष जैस्वाल

मुंबई शहर – प्रताप सरनाईक

नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा

रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम

रत्नागिरी – उदय सामंत

पुणे – अजित पवार

बीड – अजित पवार

कोल्हापूर – हसन मुश्रीफ

अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.

भंडारा – मकरंद पाटील

चंद्रपूर – नरहरी झिरवळ