Wednesday, April 17, 2024

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला, शिंदे गट आक्रमक म्हणाले शिंदे गटाची मोठी मागणी

महाराष्ट्रात महायुतीचा लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्या मंगळवारपासून सर्वत्र पाहायला मिळत आहेत. महायुतीत ३२-१२-४ असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. भाजपाला ३२, शिवसेनेच्या शिंदे गटाला १२ आणि अजित पवार गटाला ४ जागा दिल्या जाणार असल्याचा कथित फॉर्म्युला सध्या समाजमाध्यमांवरही व्हायरल होत आहे. यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी या कथित फॉर्म्युलाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

गजानन कीर्तिकर म्हणाले, हा जो फॉर्म्युला तयार केला आहे, त्याची काही अधिकृत घोषणा झालेली नाही. हे जे ३२-१२-४ आकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, याला काही आधार नाही. मुळात जागावाटपाची चर्चा कोण करतंय? त्याचा निर्णय कोण घेतंय? कुठल्या पक्षातील कोणते नेते, कोणती प्रमुख माणसं यावर काम करत आहेत? किंवा यासंबंधीचा निर्णय कोण घेत आहे? याबाबतची कुठल्याही प्रकारची माहिती आमच्याकडे नाही. मी शिवसेनेचा एक नेता आहे. आमचे मुख्य नेते पक्षाची भूमिका ठरवताना माझ्यासह आमच्याबरोबर असलेल्या इतर नेत्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. १२ जागांबाबतचा प्रस्ताव आम्हाला अजिबात मान्य नाही.शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले, “महायुतीत शिवसेनेला लोकसभेच्या १२ जागा देण्याबाबत काही ठरलं असेल तर ते आम्हाला मान्य नाही. २०१९ च्या लोकसभेचा विचार करता आमचा २२ जागांवर दावा आहे. गेल्या निवडणुकीत भाजपा २६ जागांवर लढली होती. त्यांचे तीन उमेदवार पराभूत झाले आणि त्यांनी २३ जागा जिंकल्या. तर आम्हाला २२ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी आमचे चार उमेदवार पडले आणि आम्ही १८ जागा जिंकल्या. तसेच राज्यात विरोधी पक्षांचे सात उमेदवार जिंकले.” कीर्तिकर एबीपी माझाशी बोलत होते.
शिंदे गटातील खासदार म्हणाले, एकनाथ शिंदेंबरोबर आलेल्या १३ खासदारांचं राजकीय भवितव्य टिकवणं, त्यांना राजकीय स्थिरता देणं हे एकनाथ शिंदे यांचं कर्तव्य आहे. एकनाथ शिंदे कोणाला दगा देणार नाहीत. परंतु, आम्हाला १२ जागा मान्य नाहीत. भाजपा आम्हाला इतक्या जागा देणार आणि आम्ही त्या घेणार असंही काही नाही. आम्ही केवळ १२ जागा घेऊ अशी काही स्थिती नाही. मागच्या वेळी आमचे १८ खासदार आले होते. त्यामुळे आम्हाला किमान १८ जागा मिळायलाच हव्यात. हवं तर उरलेल्या जागा राष्ट्रवादीला देता येतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles