महिला #बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारित डिजिटल मार्केटींग ॲप तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याबाबतच्या बैठकीस कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदानांवर सुट्टीच्या दिवशी बचतगटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी. ग्रामीण भागातील बचत गटांच्या उत्पादित वस्तू शहरांमधील बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.