उद्योजक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. अनेकदा ते तरुणांसाठी मोटिव्हेशनल व्हिडीओ शेअर करतात. पण यावेळी त्यांनी एक विनोदी व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ आहे एका चिमुकल्याचा. हा मुलगा चक्क ७०० रुपयांत महिंद्रा थार विकत घ्यायला जातोय. या व्हिडीओचा शेवट पाहून खुद्द आनंद महिंद्रा यांना सुद्धा हसू आवरत नाहियेत. ते म्हणतायेत, जर या मुलाचं स्वप्न खरं केलं तर मी लवकरच रस्त्यावर येईन. व्हिडीओमधील मुलाचं नाव चीकू आहे. तो आपल्या वडिलांसोबत गाड्यांवर चर्चा करतोय. खरं तर त्याला महिंद्रा थार खरेदी करायची आहे. तो म्हणतोय, महिंद्रा थारचं खरं नाव XUV 700 आहे. XUV च्या पुढे ७०० लिहिलंय कारण या गाडीची किंमत ७०० रुपये आहे. जर माझ्याकडे ७०० रुपये असते तर मी महिंद्रा थार खरेदी केली असती.
https://x.com/anandmahindra/status/1738825536573768170?s=20
“माझ्या एा मैत्रिणीनं हा व्हिडीओ मला पाठवलाय. या चिमुकल्याचे काही व्हिडीओ मी @cheekuthenoidakid या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पाहिले. हे व्हिडीओ पाहून खरंच मी सुद्धा त्याच्या प्रेमात पडलो. पण एक मोठी समस्या आहे. जर या मुलाचे दावे खरे ठरले आणि महिंद्रा थार खरंच ७०० रुपयांमध्ये विकली गेली. तर रातोरात मी रस्त्यावर येईन.” अशा आशयाची गंमतीशीर कॅप्शन महिंद्रा यांनी या व्हिडीओवर दिली आहे.
‘महिंद्रा थार केवळ ७०० रुपयांमध्ये’, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडीओ
- Advertisement -